शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (22:16 IST)

Manoj Jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, किडनीला सूज

manoj jarange
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी  मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले.राज्यभरात या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. राज्यात या आंदोलनाचे तीव्र प्रतिसाद उमटले. मनोज जरांगे पाटीलांनी आमरण उपोषण केले. सतत 9 दिवसाच्या उपोषणामुळे त्यांनी अन्न-पाण्याचा त्याग केला होता त्या मुळेत्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या प्रकृती बाबत डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचे वजन 12 किलोने कमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात राहून काही दिवसा औषधोपचार घ्यावे लागणार आहे. 

त्यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आली आहे. त्यांना अशक्तपणा आला असून त्यांचे वजन कमी झाले आहे. त्यांना किमान दहा दिवस तरी रुग्णालयात राहावे लागणार आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जरांगे पाटील हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे. 

दोऱ्यांमुळे आणि उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. 

9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले जरांगे यांनी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आहे. 


Edited by - Priya Dixit