शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (14:57 IST)

मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. दुपारी 12.15 च्या सुमारास दोघांची भेट झाली. संभाजीराजे हे मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) त्यांची भूमिका जाणून घेतली. यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजता ही भेट नियोजित आहे. 
 
त्यानंतर संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मी देवेंद्रजींनी सांगितले की, मराठा समाजातील गरिबांची वाईट परिस्थिती आहे. समाज अस्वस्थ आहे. या समाजाला न्यार मिळवून दिला नाही तर आपण सर्वजण जबाबदार असू. आपण या समाजाला न्याय देण्यासाठी राजकारणापलिकडे पाहायला हवं. त्यासाठी मुख्यमंत्री – विरोधी पक्ष नेते यांनी सर्वांनी एकत्र यायला हवं. 
 
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. आता यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.