शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (16:27 IST)

दत्त आरती - जयदेव जयदेव जय त्रिगुणात्मक देवा

जयदेव जयदेव जय त्रिगुणात्मक देवा । श्रीगुरुदत्तात्रय, विधि-हरि-हर, महादेवा ॥धृ.॥
 
जयजय श्रीमृगराजाचल पर्वतवासा । जय जय श्रीमहायोगी जन-मानस-हंसा । जय जय श्रीदशशतदल पंकजनिवासा । जय जय श्रीनिरंजन भुवनविलासा ॥जय.॥१॥
 
दंड-कमंडलुमंडित रुद्राक्षमाळा । जटा-मुकुटधृतकुंडल पीतांबर पिवळा । कंथा त्रिशुळ, डमरू, भुजंगहार गळां । मुद्रा भस्म विलेपन त्रिपुंड्र गंधटिळा ॥जय.॥२॥
 
भ्रमोनि दिग्मंडळ भूस्थळ अंतराळीं । येतसे अवधुत मूर्ती सायंकाळीं । होतसे जयजयकार गजर गदारोळी । नाचे भूतगणांसह शिव चंद्रमौळी ॥जय.॥३॥
 
श्रीषड्रगुणसंपन्न श्रीषड्रभुजमूर्तीं । भूवैकुंठ विराजे सिंहाद्रीवरती । नांदे भुक्ती, मुक्ती, धर्म, दया, शांती । विष्णुदास म्हणे श्रीगुरुपदिं विश्रांती ॥जय.॥४॥