Tulja Bhavani Aarti आरती तुळजापूर भवानीची
जय जय मायभवानी अंबा तुळजापुरवासिनी हो ।
चित्शक्ति श्रीदुर्गा भैरवि अघतमविनाशनी हो ॥धृ०॥
कृतयुगाचे ठायिं दैत्य म्हैसासुर प्रगटला हो ।
त्याच्या त्रासाभेणें मोठा हाहा:कार उठला हो ॥१॥
गाईच्या रूपानें पृथ्वी ब्रह्माचें जाउन हो ।
होती जालि कष्टि अपुलें गार्हाणें सांगुन हो ॥
तेव्हां हरिहरव्रह्मा आले तुजलागीं शरण हो ॥२॥
वंदुनिया स्तुतिस्तवनें अंबे करिति तव विनवणी ।
रक्षी विश्वजगातें ह्मणवुनि लागति ते चरणीं हो ।
अभयवरातेम देउनि सुरवर पाठविले ते क्षणीं हो ॥३॥
नाना अयुधें सेवुनि धरिला अष्टभुजा अवतार हो ।
अउट कोटि चामुंडा घेऊनि सांगातें हो ।
सिंहारुढ होउनिया केला दैत्यांचा संहार हो
हेल्याच्या रूपानें पळतां जाला ह्मैसासुर हो ।
ते काळीं शस्त्रानें उडवुनि दिधलें त्याचें शिर हो
जयजयकारें सुरवर करिति निरंजन परिकर हो ॥४॥
************************************************
************************************************
तुळजा भवानी आरती
जय देवी जय देवी तुळजा अंबाई ।
चंड मुंड वधुनिया महिषासुर वधुनिया ।
ठेविलासे तुझे पायी ॥ धृ ॥
वाघावर स्वार झाली, हाती सोन्याचे गोट ।
बाजूबंद दंडामधी, शोभती गोमटे ।
जय देवी जय देवी तुळजा अंबाई ॥ १ ॥
आई तुझे दरबारी, लाख खंडीभर तेल ।
जैसे कोदीमध्ये (कुंडामध्ये), प्रकाश हा फाकला।
जय देवी जय देवी तुळजा अंबाई ॥ २ ॥
कवड्याची गळी माळ, करते भक्तांचा संभाळ ।
तुळजापूरची माता भवानी, आरती करतो नेमाने ।
जय देवी जय देवी तुळजा अंबाई ॥ ३ ॥
जय देवी जय देवी तुळजा भवानी ।
चंड मुंड वधुनिया महिषासुर वधुनिया ।
ठेविलासे तुझे पायी ॥
***************************
***************************
जय जय भवानी, मनरमणी, मातापुरवासिनी।
चवदा भुवनांची स्वामिनी, महिषासुरमर्दिनी ॥ जय जय भवानी ॥ धृ ॥
नेसूनि पाटाऊ, पिवळा हार शोभती गळा।
हाती घेऊनिया त्रिशूळा भाळी कुंकुम टिळा ॥ जय जय भवानी ॥ १ ॥
अंगी लेवूनिया काचोळी, वर मोत्याची जाळी।
हृदयी शोभतसे, पदकमळी कंठी हे गरसोळी ॥ जय जय भवानी ॥ २ ॥
पायी घागरिया, घूळघूळ नाकी मुक्ताफळ।
माथा केश हे कुरळ, नयनीही काजळ ॥ जय जय भवानी ॥ ३ ॥
सिंहावरी तू बैसून मारिसी दानवगण।
तुजला विनवित, निशिदिन गोसाविनंदन।।
जय जय भवानी ॥ ४ ॥
***********************
***********************

