बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 मार्च 2018 (15:25 IST)

साप्ताहिक राशीफल 1 ते 7 एप्रिल 2018

मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील व कौटुंबिक सदस्य मंडळीबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थीती सर्वसामान्य होईल. अंतिम चरणात संततीबाबत असणारी काळजी मिटेल व संततीबाबत चिंता मिटण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. परीक्षेमधील निकाल समाधानकारक लागेल व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढीस लागेल.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात इतरांकडून आवश्यक स्वरूपाचे सहकार्य वेळेवर लाभेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यशाचीच राहील व अपयश सहसा येणार नाही. अंतिम चरणात पारिवारिक समस्या व प्रश्न मिटतील. तसेच दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. मानसिक समाधान मिळून उत्साह वाढीस लागेल.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. हातात पैसा खेळताच राहील व आर्थिक चिंता मिटण्याच्या दृष्टिक्षेपात राहू शकेल व यश समोर दिसेल. अंतिम चरणात क्रीडा क्षेत्रात नवनवीन प्रयोग यशस्वी होईल व क्रीडा क्षेत्रातील आपले वर्चस्व वाढेल व बक्षीसपात्र स्थिती कायम राहील. सहकारीवर्ग अपेक्षेइतके सहकार्य करू लागतील.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक सुख-समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. अपयशाचा सामना करावा लागणार नाही व सर्वत्र यश समोर दिसेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता राहील. आर्थिक गुंतवणूक करणेपूर्वी अनुभवींचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल. उत्साहवर्धक वार्तापत्र हाती येऊन यशस्वीतेकडे वाटचाल राहू शकेल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. शांतता ठेवणेच उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. कर्जव्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी राहील व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहतील.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहील. अंतिम चरणात इतरांकडून येणारा पैसा या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली राहील. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला फक्त ऐकणेपुरताच र्मगादित ठेवणे आवश्यक व उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळून उत्साह वाढीस लागू शकेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात व्यावसायिक समस्या मिटतील व उद्योगक्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येतील व अधिकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. अधिकारी वर्गाने आपल्यावर सोपविलेली कामगिरी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहील. अंतिम चरणात सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहील व जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येईल व आर्थिक अस्थिरता दूर होऊन आर्थिक स्थिरता कायम राहील.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून येईल व मनावर असलेले काळजीचे दडपण कमी होऊन उत्साहवर्धक स्थिती राहील. अंतिम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील अपूर्ण व स्थगित व्यवहार कामे गतीने पूर्ण होतील. या सप्ताहातील ग्रहमान आर्थिक गुंतवणूक करण्यास विशेष लाभदायक ठरू शकेल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरू शकेल. शांतता ठेवणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे कोणतेही काम सहसा अपूर्ण राहणार नाही व अपेक्षित यश समोर दिसेल. जवळचा प्रवासयोग घडून प्रवास कार्यसाधक राहून यश मिळेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा फायदा घडेल व नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर येईल व आलेला प्रस्ताव स्वीकारावा. भावी काळासाठी तो फायदेशीर ठरेल. अंतिम चरणात अडथळे व समस्या निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात केलेला संघर्ष वाया जाण्याची दाट शक्यता आहे. सावधानता ठेवणे उचित ठरू शकेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील व निरागस आरोग्य लाभेल. विरोधक मंडळींचा त्रास व ससेमिरा काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील व विरोधक मंडळी गुप्त रीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवून वाटचाल करतील. अंतिम चरणात कोणत्याही बाबतीत अंतिम निर्णय घेणेपूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामांचा अंदाज व आढावा घेणे उचित ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत आनंद वार्ता व समाचार हाती येतील व महत्त्वपूर्ण कामांच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. आर्थिक बाजू मजबुतीच्याच शिखरावर राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. अंतिम चरणात निरागस आरोग्याचा लाभ मिळेल व विरोधक मंडळी गुप्त रीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवतील. अचानक प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक आनंद वाढीस लागेल.