रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:20 IST)

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: मेष

ह्या वर्षी आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. आपणास चांगल्या संपत्तीचा लाभ देखील मिळेल. परदेशी संपर्कातून आपणास फायदा मिळेल.
 
जानेवारी, फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, आणि नोव्हेंबर या महिन्यात आपल्याला धन लाभ होण्याची शक्यता आहे. आपण धार्मिक कार्यासाठी थोडा पैसा खर्च कराल. ह्या काळात तुम्हाला सन्मान मिळेल. ह्या वर्षी आपली आर्थिक बाजू अधिकच भक्कम राहणार आहे. अर्थातच आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ राहील. आपण आपल्या काही मित्र आणि नातेवाइकांना गरजेच्या वेळेस मदत कराल. नोकरदारांना अधिक लाभ मिळेल. त्यांना मनाप्रमाणे चांगल्या पगाराची नोकरी मिळेल.
 
जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पैशांची आवक चांगली राहणार आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल महिना थोडा खर्चिक असणार आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. पण त्यानंतर आपली आर्थिक स्थिती पूर्वीप्रमाणेच पुन्हा मजबूत होईल आणि आपण चांगले आर्थिक जीवन भोगू शकाल.
 
मे महिन्यात आपल्याला आपले मित्र व आप्तेष्ट यांकडून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये, आपल्या चांगल्या संवादाच्या कौशल्यतेमुळे आपले सर्व कार्य पूर्ण होतील त्यामुळे पैशांची चांगली आवक असेल. भागीदारी व्यवसायाच्या लोकांनी आपल्या जोडीदाराशी सलोख्याची संबंध ठेवली पाहिजे. भागीदाऱ्यांनी व्यवसायात केलेले प्रयत्न आर्थिक फायदा मिळवून देतील आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळवून देतील. चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदात जगू शकता आणि भविष्यासाठी निधीचा संचय करून ठेवू शकता. ह्या वर्षात अधिक प्रवास घडण्याचे देखील योग आहेत.