शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (18:11 IST)

beauty tips : सिल्की & शाईनं केसांसाठी करा बियरचा वापर

hair
सुंदर केस एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात अधिक भार टाकतात. मग तो पुरुष असो की महिला. सर्वांनाच आपल्या केसांना शाइनी आणि सिल्की ठेवण्यासाठी वेग वेगळ्या प्रकारांच्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागतो, पण या प्रॉडक्ट्समुळे केसांना नुकसान होण्याची भिती सदैव असते. म्हणून घरगुती कंडिशनरचं केसांसाठी उत्तम असतात. म्हणून जाणून घेऊ असे काही घरगुती कंडिशनर्सबद्दल ...
 
1. एक कप बियरला एखाद्या भांड्यात तोपर्यंत गरम करा जो पर्यंत त्याचे प्रमाण अर्धे राहत नाही. गरम केल्याने बियरमधील अल्कोहल वाफ बनून उडून जाते. आता याला गार होऊ द्या, नंतर यात आपल्या पसंतीचा शँपू मिसळून द्या, लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे ज्या शँम्पूचा वापर करत असाल तो एकाच ब्रँडचा असायला पाहिजे. या घोळला एका बाटलीत भरून ठेवा. जेव्हा कधी केस धुवायचे असतील याने केस धुआ, यामुळे राठ केसांमध्ये देखील निखर येईल. केस चमकदार आणि सुंदर दिसतील.  
 
2. केळी केसांसाठी फारच उत्तम मानण्यात आले आहे. केळींची पेस्ट तयार करून त्यात काही थेंब मधाचे टाकून ही पेस्ट 30 मिनिटापर्यंत केसांवर लावून ठेवावे. नंतर गार पाण्याने केस धुऊन टाकावे. 
 
3. आपल्या केसांना शॅम्पूने धुतल्यानंतर बियरचे काही थेंब पाण्यात घालून त्या पाण्याने एकदा परत केस धुऊन टाकावे. नंतर स्वच्छ पाण्याचे धुवावे. बियरमुळे तुमच्या केसांमध्ये चमक येईल आणि ते प्राकृतिकरीत्या मजबूत होतील.  
 
4. केसांना शाईनी बनवण्यासाठी दह्यात शॅम्पू घालून आधीपासून लावून ठेवावे. डोक्यात जर कोंडा असेल तर काही थेंब लिंबाच्या रस त्यात घालून केसांना लावावे. वर दिलेले हे उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल.