बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (19:54 IST)

उन्हाळ्यात टॅनिग दूर करण्यात प्रभावी जिरे चेहऱ्यावर येईल चमक

उन्हाळ्यात ऊन, धूळ,माती आणि प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज दिसतो. चेहऱ्यावर आणि हातापायांवर टॅनिग होते. हे दूर करण्यासाठी पार्लर मध्ये खेंप्या लावाव्या लागतात. आपण ही टॅनिग घरातच दूर करू शकता. या साठी आपल्याला गरज आहे जिरेची.ह्याचे फेसपॅक बनवून आपण टॅनिग दूर करू शकता. 
 
प्रत्येक स्वयंपाकघरात जिरे सहज आढळतात. त्वचेची टॅनिग दूर करण्यासाठी जिरे दरीदरीत वाटून घ्या. त्यात गुलाबपाणी आणि दही मिसळून फेस पॅक बनवून घ्या. हे हातापायाला लावून 10 मिनिटे तसेच ठेवा.नंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. काहीच दिवसात फरक जाणवेल.
 
*उन्हाळ्यात चेहरा निस्तेज दिसतो नितळपणा आणि चमक नाहीशी होते .जिरे वाटून पूड करा या मध्ये हळद आणि मध मिसळा.  कोरडे झाल्यावर पाण्याने धुऊन घ्या. या मुळे चेहऱ्यावरील चमक पुन्हा येते आणि निस्तेजपणा दूर होईल. 
 
*वाढत्या वयासह सुरकुत्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर हरभराडाळीचे पीठ आणि जिरेपूड कच्च्या दुधात मिसळून पेस्ट बनवून लावल्याने चेहऱ्यावर त्याचा प्रभाव दिसू लागतो.
 
*चेहऱ्यावर पार्लर सारखी चमक मिळविण्यासाठी जिऱ्याचे स्क्रब बनवून लावा. या साठी  दोन चमचे जिरे, एक चमचा मध, एक चमचा बदामाचे तेल ,तीन ते चार थेंबा टी ट्री तेल .हे सर्व साहित्य मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आठवड्यातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होते आणि चेहरा उजळतो चेहऱ्यावर चकाकी येते. टी ट्री तेल हे त्वचेला मॉइश्चराइझ करण्याचे काम करतो.