बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Makeup Tips हरतालिका तृतीयेला सुंदर आणि आर्कषक दिसण्यासाठी खास मेकअप टिप्स

makeup
हरतालिका तृतीयेला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वात कठिण असल्याचे मानले गेले आहे कारण या दिवशी पाणी देखील पिऊ नये अशी पद्धत आहे. अविवाहित मुली देखील इच्छित वर प्राप्तीसाठी हा व्रत करतात. या दिवशी सुंदर तयार होऊन महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. आपण देखील या खास दिवशी सुंदर दिसू इच्छित असाल तर हे सोपे मेकअप टिप्स आपल्यासाठी आहेत-
 
मेंदी लावावी
भारतीय परंपरेत मेहंदी नेहमीच खूप शुभ मानली जाते. प्रत्येक सणात महिला निश्चितपणे मेहंदी लावतात, ज्यामुळे त्यांच्या हातांचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते. या दिवशी तुम्ही तुमच्या हातावर मेंदी लावा आणि तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवा. आपण नवीनतम ट्रेंडनुसार मेहंदी लावू शकता.
 
चेहऱ्याची क्लींजिंग आणि टोनिंग
जेव्हाही तुम्ही चेहऱ्यावर मेकअप लावाल, त्याआधी ते व्यवस्थित स्वच्छ करा. सर्वप्रथम, चेहऱ्याची योग्य क्लींजिंग आणि टोनिंग करा. यानंतर बर्फाने देखील चेहरा स्वच्छ करू शकता. असे केल्याने तुमचा मेकअप बराच काळ टिकेल.
 
चेहरा मॉइश्चराइझ करा
चेहर्‍याची क्लींजिंग आणि टोनिंग केल्यानंतर चेहरा मॉइश्चराइझ करायला विसरु नका. याने चेहर्‍याचा ओलावा टिकून राहतो आणि चेहरा ड्राय दिसत नाही.
 
फाउंडेशन वापरा
फाउंडेशन बेस ने चेहरा स्मूथ आणि इवन होतो. फाउंडेशन लावताना आपल्या स्किन टोन लक्षात असू द्या.
 
कंसीलर आणि फेस प्राइमर लावा
कंसीलरच्या मदतीने चेहर्‍यावरील डाग लपवता येतात. कंसीलरचे डॉट्स लावून स्पॉन्जच्या मदतीने ते सेट करा. नंतर चेहर्‍यावर फेस प्राइमर लावा. याने चेहर्‍यावर खूप काळ मेकअप टिकून राहतो.
 
आय मेकअप
यानंतर आय मेकअप मध्ये डोळ्यांवर आयशेडो लावा आणि नंतर काजळ आणि मस्कारा वापरा. लिक्विड काजळऐवजी पेंसिल काजळ वापरणे अधिक सोपं जाईल.
 
सर्वात शेवटी लिपस्टिक 
आपल्या साडीला मॅच करत असलेलं लिपस्टिक लावा. सण म्हणून डॉर्क शेड आणि जाड लिप लाइनर देखील उठून दिसेल.