बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:12 IST)

हरतालिका तृतीया 2022 व्रत नियम

hartalika puaj katha
हरतालिका व्रत सुवासिनी आपल्या नवर्‍याच्या दिघार्युष्यासाठी करतात आणि या दिवशी महादेव-पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत करतात. शृंगार करून व्रत, पूजा, आरती आणि कहाणी करतात. अनेक स्त्रिया रात्री चंद्राला अर्घ्य देखील देतात. या व्रताचे काही नियम आहेत ते जाणून घेऊया-
 
1 हरतालिका तृतीयेच्या उपवासात पाणी पीत नाही. उपवासानंतर दुसऱ्या दिवशी पाणी ग्रहण केले जाते.
2 हरतालिका तृतीया उपवास करताना याला सोडण्याची पद्धत नसते. दरवर्षी हे व्रत कैवल्य विधी-विधानाने केले पाहिजे.
3 हरतालिका तृतीयेच्या उपवासाच्या दिवशी रात्री जागरण केले जाते. रात्री भजन कीर्तन करावं.
4 हरतालिका तृतीयेचा उपवास कुमारिका, सवाष्ण बायका करतात तसेच शास्त्रात किंवा आपल्या धर्मग्रंथात विधवा बायकांना देखील हा व्रत करण्याची परवानगी आहे.
5 हरतालिका तृतीयेला देवी पार्वती आणि महादेवाची विधी विधानाने पूजा केली जाते.
6 हरतालिका तृतीया व्रत मुहूर्त बघून किंवा प्रदोषकाळात केले जाते. सूर्यास्तानंतरचे तीन मुहूर्ताला प्रदोषकाळ म्हटले जाते. हे दिवस आणि रात्र यांचा भेटण्याचा काळ असतो.
7 हरतालिका पूजेसाठी महादेव, देवी पार्वती आणि भगवान गणेशाची वाळूमातीची आणि काळ्या चिकणमातीच्या मूर्ती हाताने बनवावी.
8 पूजेच्या ठिकाणी फुलांनी सजवून एक चौरंग ठेवा आणि त्या चौरंगावर केळ्याची पाने ठेवून मूर्ती स्थापित करावी.
9 या नंतर देवांचे आव्हान करून महादेव, देवी पार्वती आणि भगवान श्रीगणेशाची षोडशोपचार पूजा करावी.
10 सौभाग्याचा सर्व वस्तू एका ताटलीत ठेवून देवी पार्वतीला अर्पण करण्याची प्रथा आहे.
11 या मध्ये महादेवाला धोतर आणि पंचा अर्पण करतात. यामधील सर्व सौभाग्याचं लेणं सासू किंवा सवाष्ण बाईच्या पायापडून ब्राह्मणाला दान म्हणून द्यावी.
12 अश्या प्रकारे पूजा केल्यानंतर कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावं. आरती केल्यावर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही - भात कानवाल्याचा नैवेद्य दाखवावा.