मुलेठी केसांसाठी फायदेशीर, जाणून घ्या वापर
आरोग्यासाठी मुलेठीचे अनेक फायदे आहेत. याचा वापर विडा तयार करण्यासाठी करण्यात येतं. हे चव आणि आरोग्यासाठी चांगले आहे. याव्यतिरिक्त त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया केसांसाठी मुलेठीचा वापर कशा प्रकारे करावा.
मुलेठी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. जर तुमच्या केसांमध्ये डोक्यातील कोंडा असेल, तर मुलेठी वापरून तुम्ही कोंडाच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतात.
साहित्य
1 टीस्पून लिंबू
1 टीस्पून मध
1 टीस्पून मुलेठी
लिंबाचा रस आणि मध चांगले मिसळा. आता त्यात मुलेठी पावडर मिसळा. टाळूवर स्क्रब लावा आणि केसांच्या लांबीवर लावा. 30 मिनिटांनंतर धुवा. एक दिवसाआडे हा उपाय करता येईल.
केसांच्या वाढीसाठी मुलेठी फायदेशीर आहे. याने केस गळण्यास प्रतिबंध करता येतं आणि टाळू स्वच्छ करण्यास मदत होते. हे अधिक ऑक्सिजन केसांच्या मुळांपर्यंत पोहोचू देतं. केसांच्या वाढीसाठी या प्रकारे मुलेठी वापरावी.
साहित्य
3 चमचे नारळ तेल
1 टीस्पून मुलेठी पावडर
एका भांड्यात खोबरेल तेल काढून गरम करा. आता या तेलात मुलेठी पावडर घाला. दोन्ही चांगले मिसळा. आता हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा. यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी तेल फिल्टर करा. किंचित गरम करा आणि मुळांपासून केसांच्या लांबीपर्यंत लावा. आता तेल दिवसभर केसांना लावलेलं राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने धुवा. सर्वोत्तम परिणामांसाठी, दर 15 दिवसांनी केसांमध्ये मुलेठी लावा.
मुलेठीमध्ये व्हिटॅमिन ई असतं. याने केसांना पोषण आणि हायड्रेट मिळते. चला तर मग जाणून घेऊया केसांना पोषण देण्यासाठी मुलेठीच्या मदतीने कंडिशनर कसा बनवायचं-
साहित्य
1 टीस्पून मुलेठी
2 चमचे आंबट दही
एका वाडग्यात दही घ्या आणि त्यात मुलेठी पावडर घाला, मिश्रण चांगले मिसळा. 30 मिनिटांसाठी केसांवर लावा आणि धुवा. आठवड्यातून एकदा या उपायाचं अनुसरण करा.