शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (09:15 IST)

काय सांगता, सेंधव मिठाने डाग रहित उजळ त्वचा मिळते

कमी लोकांना हे माहीत आहे की मीठ देखील एक सौंदर्य उत्पादन म्हणून आहे. आपण स्क्रब म्हणून त्वचेच्या समस्यांना दूर करण्यासाठी हे वापरू शकता. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे त्वचेला कोणतीही हानी होणार नाही.हे वापरल्याने त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकते. त्वचेवरील ब्लॅकहेड्स देखील काढून टाकले जातात. आपण या गोष्टींसह ह्याचा वापर करू शकता.सेंधव मिठाला एप्सम मीठ म्हणून देखील ओळखतात.
 
1 लिंबू आणि मीठ स्क्रब -
एप्सम मीठ किंवा सेंधव मिठात लिंबाच्या काही थेंबा मिसळून पेस्ट तयार करा. हे चेहऱ्यावर वर्तुळाकार लावा. आठवड्यातून दोन वेळा या स्क्रबला वापरल्याने मुरूम,मृत त्वचा,ब्लॅकहेड्स,आणि व्हाईटहेड्स सहजपणे स्वच्छ होतात.
 
2 सेंधव मीठ आणि बदामाचे तेल-
जर आपली त्वचा कोरडी आहे तर सेंधव मीठ आणि तेलाचे मिश्रण फायदेशीर आहे. आपली इच्छा असल्यास सेंधव मिठात बदामतेलाच्या ऐवजी ऑलिव्ह तेलाच्या काही थेंबा मिसळू  शकता. या मुळे चेहरा स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर ओलावा कायम राहील.
 
3 सेंधव मीठ आणि मध -
मध हे टॅनिग काढण्याचे काम करते आणि त्वचेचे नैसर्गिक मॉइश्चरायझर तसेच ठेवते. आठवड्यातून दोनवेळा या स्क्रबचा वापर केल्यास आपण सुंदर, नितळ,शुद्ध त्वचा मिळवू शकता. 
 
4  सेंधव मीठ आणि ओटमील- 
हे स्क्रब तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी चांगले आहे. ओटमील आणि सेंधव मिठाला मिसळून या मध्ये लिंबाचा रस,बदामाचे तेल, घालून पेस्ट बनवा, ही पेस्ट वर्तुळाकार चेहऱ्यावर हळुवार हाताने लावा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. 
कधी-कधी हे स्क्रब लावणे चांगले आहे. दररोज ह्या स्क्रब चा वापर केल्याने चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी होते. हळुवार हाताने चेहऱ्यावर वर्तुळाकार हे स्क्रब लावा आणि चोळा. स्क्रब खूप कोरडे नसावे. वेळोवेळी पाणी किंवा गुलाबपाण्याच्या काही थेंबा घालून चेहऱ्यावर मॉलिश करणे चांगले आहे.