रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मे 2022 (16:06 IST)

Sunburn Home remedies सनबर्नच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा

Sunburn Home remedies सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि त्वचेच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. विशेषत: उन्हाळी हंगामातील कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे अधिक नुकसान होते. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा करपते आणि त्वचेवर लाल ठिपके दिसतात. या स्थितीला सनबर्न म्हणतात. सनबर्न हे सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने होणाऱ्या नुकसानाचे लक्षण आहे. जेव्हा सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे त्वचेवर पडतात तेव्हा त्वचेवर त्याच्याशी संबंधित प्रतिक्रिया होते. त्यामुळे त्वचेवर खाज, संवेदना आणि सूज यासारख्या समस्या उद्भवतात. त्वचेला सूर्याच्या नुकसानापासून पुनर्प्राप्तीची स्वतःची यंत्रणा आहे, परंतु यास बराच वेळ लागू शकतो. त्याच वेळी, जर उन्हाचा त्रास जास्त असेल तर लोकांना त्वचेच्या गंभीर समस्या देखील होऊ शकतात. सनबर्न झालेल्या त्वचेपासून आराम देण्यासाठी आणि सनबर्नपासून लवकर बरे होण्यासाठी काही घरगुती उपायांचाही प्रयत्न केला जाऊ शकतात ज्यामुळे त्वचा लवकर बरी होण्यास मदत होते. अशा काही टिप्स तुम्ही इथे वाचू शकता तसेच सनबर्नच्या लक्षणांबद्दलही वाचू शकता.
 
सनबर्नची लक्षणे काय आहेत? Symptoms of Sunburn on skin
त्वचा लाल होणे
कोरडी त्वचा
त्वचा ताणणे
खाज सुटणे
वेदना आणि सूज
त्वचा काळी पडणे
 
सनबर्नपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय Home remedies to get rid of Sunburn
लिंबू आणि बेसन
बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते तसेच मऊ बनवते. सनबर्न झाल्यास बेसन आणि लिंबाचा रस एकत्र करून त्वचेवर लावल्यास फायदा होतो. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आढळते जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतं. यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेला चमक येते. लिंबू आणि बेसन पेस्ट चेहऱ्यावर अशा प्रकारे लावू शकता- 2 चमचे बेसन घ्या. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. गरजेनुसार त्यात गुलाबपाणी टाकून क्रीमी पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे तशीच राहू द्या. चेहरा थंड किंवा साध्या पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझिंग क्रीमने चेहऱ्याला मसाज करा.
 
या सोप्या टिप्स देखील उपयोगी पडतील
टोमॅटो मॅश करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुऊन घ्या.
नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने सन टॅन आणि सनबर्नची समस्याही कमी होते.
काकडी, दुधी आणि टरबूज यांसारख्या रसदार भाज्या आणि फळे मॅश करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे उन्हामुळे होणारे नुकसान कमी होते आणि सनबर्नपासून आराम मिळतो.
पुदिन्याची पाने कडुलिंबाच्या पानांसोबत थंड पाण्यात बारीक करून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि उन्हामुळे होणारे नुकसान कमी होते.