सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

हातावरील मेंदी झटपट काढण्यासाठी हे करा

मेंदी झटपट काढण्यासाठी तीन चमचे बेकिंग सोड्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. ही पेस्ट हाताला लावून चोळा. दहा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे मेंदीचा रंग फिका होईल.
 
विशेष प्रसंगी हातांवर मेंदी काढली जाते. ही मेंदी दोन-तीन दिवस टिकते नंतर मेंदीचा रंग फिका पडू लागतो. मेंदी उतरू लागली की हात कसेतरीच दिसतात. नवी मेंदी काढायची तरी प्रश्न पडतो. अशा वेळी हातांवरची मेंदी झटपट काढून टाकण्यासाठी काही उपाय करता येतील का, असा प्रश्न पडतो. यासाठी जाणून घेऊ या काही उपाय...
* चेहर्‍यावर लावण्याच्या ब्लीचचा वापर मेंदी काढण्यासाठीही होऊ शकतो. हातांवर ब्लीच लावून थोड्या वेळाने थंड पाण्याने धुवून टाका. लिंबानेही मेंदी निघते.
 
* मेंदी झटपट काढण्यासाठी तीन चमचे बेकिंग सोड्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. ही पेस्ट हाताला लावून चोळा. दहा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे मेंदीचा रंग फिका होईल. यानंतर लिंबाचे तुकडे घेवून हातांवर चोळा. यामुळे मेंदी निघून जाईल.
 
* मेंदी काढून टाकण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करता येईल. ऑलिव्ह ऑईलमध्ये मीठ घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण हातांवर लावा. काही वेळानंतर कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करा. यामुळे मेंदीचा रंग फिका पडेल आणि त्वचा कोरडी होणार नाही.
 
* हातांवर काढलेली आधीची मेंदी दूर करण्यासाठी हे उपाय करता येतील. यामुळे हातांवर नव्याने मेंदी काढणं सोपं जाईल.