शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

पर्समध्ये मुळीच ठेवू नये या 7 वस्तू, होऊ शकतो धन अभाव

अधिकश्या आमचा पर्स फालतू वस्तूंनी भरलेला असतो. आळशीपणामुळे आम्ही पर्स स्वच्छ करत नाही आणि याच कारणामुळे त्रास होतो. खरंच पर्समध्ये अश्या काही वस्तू ठेवलेल्या असतात ज्यामुळे धनाचे आगमन थांबतं. म्हणून आपल्या पर्समध्ये जर या 7 वस्तू ठेवलेल्या असतील तर यांना लगेच बाहेर काढा.
जुने आणि फाटके नोट
जुने नोट आता चलनातून बाहेर झाले आहे. म्हणून आपणही हे नोट पर्समधून बाहेर काढून टाका. फाटके आणि जुन्या नोटांमुळे मूड अस्वस्थ होतं आणि विचारांमध्ये नकारात्मकता येते म्हणून हे नोट लगेच हटवावे.

जुने बिल
अनेक लोकांना जुने बिल सांभाळून ठेवण्याची सवय असते परंतू ही सवय धन आगमन थांबवते. जुने बिल सांभाळून ठेवायचेच असतील तर दुसर्‍या अर्थात आपल्या घरी अलमारीत जपून ठेवावे.
 
दिवंगत लोकांचे फोटो
दिवंगता लोकांच्या फोटोशी आमचं भावनिक नातं असतं. परंतू ही सवय धनाचे प्रबल योग कमजोर करते. आपल्या दिवंगत नातेवाइकांचे फोटो घरात स्मृती स्वरूप लावावे परंतू पर्समध्ये त्यांचे फोटो ठेवणे योग्य नाही.
 
कर्जाचा हिशोब
आम्ही उधार घेतले आ‍हे किंवा कोणाला उधार दिले आहे तर याचा हिशोब डायरीत लिहून ती डायरी घरात ठेवावी. हा हिशोब पर्समध्ये ठेवल्याने गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होतो.
इष्टदेवाचा फोटो
आमच्या रद्धेप्रमाणे आम्ही देवांचे फोटो आपल्या पर्समध्ये ठेवतो परंतू हे योग्य नाही. फोटोऐवजी आपण यंत्र पर्समध्ये ठेवू शकतात.
 
टोकदार वस्तू 
अनेक लोकं सुरक्षेच्या दृष्टीने रेझर, चाकू किंवा इतर टोकदार वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवतात. परंतू याने नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पेश्याच्या बाबतीत या वस्तू शत्रू प्रमाणे आहे. तरी सुरक्षेच्या दृष्टीने या वस्तू ठेवणे आवश्यक असतील तर पर्सच्या गुप्त खिशात ठेवाव्या.
 
फालतू कागद आणि वस्तू
अनेकदा किती तरी दिवस निरुपयोगी वस्तू आणि कधी कामास न येणार्‍या वस्तू पर्समध्ये पडलेल्या असतात. आळशीपणामुळे त्या बाहेर काढल्या जात नाही. अशामुळे पर्समध्ये पैसा टिकत नाही कारण स्वच्छता पसंत देवी लक्ष्मी अश्या ठिकाणी वास करत नाही.