गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (17:02 IST)

लवकरच 200 रुपयांची नोट येणार

केंद्र सरकारने  दोनशे रुपयांची नोटही बाजारात आणण्याची अधिसूचना  जारी केली आहे.  त्यामुळे ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ लवकरच 200 रुपयांची नोट आणणार असल्याच्या वृत्तावर अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं.आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या सूचनेनुसार दोनशेच्या नोटांचे तपशील करण्यात आले आहेत.

दोनशे रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय मार्च महिन्यात झाल्याचं समजत.  त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नव्या नोटांच्या छपाईचे आदेश दिले. मैसूर आणि सालबोनीमधील प्रिंटिंग प्रेसना नोटांच्या छपाईचे आदेश देण्यात आले आहे. याआधी सोशल मीडियावर नव्या दोनशे रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल झाले होते. आता केंद्रातर्फे या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आला.