सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (07:51 IST)

करा शॉपिंग, Diwali with Mi सेलचं आयोजन

फेस्टिव्हल सीजनमध्ये शाओमीने Diwali with Mi सेलचं आयोजन केलं आहे. यात डिस्काऊंटसह ग्राहकांना No-Cost EMI, एक्सचेंज ऑफर, कमी किंमतीत डिवाइस प्रोटेक्शन प्लान असे ऑप्शन देण्यात येत आहेत. Diwali with Mi सेल शाओमीच्या वेबसाइट mi.comवर २५ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
 
सेलमध्ये शाओमीकडून त्यांच्या स्मार्टफोनवर १२ हजार रुपयांचा, टीव्हीवर १० हजार रुपयांचा तर इतर ऑडिओ ऍक्सेसरीजवर ५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. 
 
सेलदरम्यान दररोज १२ वाजता कंपनीचे तीन स्मार्ट टीव्ही  Mi TV 4X (43 इंच),  Mi TV 4X (50 इंच) आणि  Mi TV 4X (65 इंच) यावर डिस्काऊंट मिळणार आहे. कंपनीने हे स्मार्ट टीव्ही भारतात काही दिवसांपूर्वीच लॉन्च केले आहेत. २४ हजार ९९९ या सुरुवातीच्या किंमतीपासून स्मार्ट टीव्ही ग्राहक खरेदी करु शकतात. 
 
Mi च्या इयरफोनवरही ५०० रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. Xiaomi Diwali with Mi सेलमध्ये कॅमेरा, स्मार्ट बल्ब, पॉवरबँक, ट्रिमर, शूज यावरही डिस्काऊंट देण्यात आला आहे.