गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (15:27 IST)

इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर सरकार देणार आहे सब्सिडी, किंमत वेगाने खाली येतील

सरकार आता देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे आणि यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर सब्सिडी देखील देण्यात येत आहे. पण इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरींना परदेशातून मागवून त्या मोटार कारींमध्ये वापर करण्यात येतात म्हणून इलेक्ट्रिक मोटारींचे भाव वाढून जातात. या किमतीला कमी करण्यासाठी आता वित्त मंत्रालयाने इलेक्ट्रिक कारींच्या बॅटरीवर अनुदान अप्रूव केले आहे. माहितीनुसार सरकार प्रत्येक वर्षी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर 700 कोटींची सब्सिडी देऊ शकते. आता इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी भारतातच तयार करण्यासाठी कंपन्या काम करत आहे. 
 
सरकारने उचललेल्या या पाउलामुळे इलेक्ट्रिक वाहन आता स्वस्त होतील ज्यामुळे लोक पेट्रोल झिझेलच्या कारी विकत घेण्यापेक्षा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर जोर देतील.  सध्या प्रती किलोवॉट ऑवर बॅटरीची किंमत 276 डॉलर (19,800) येत होती ज्याला अनुदान मिळाल्यानंतर या खर्चाला 76 डॉलर (5,450 रुपये) करण्यात येईल. या सब्सिडीमुळे येणार्‍या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे भावात फार कमी होतील.  
 
नुकतेच हुंडई आणि टाटा ने भारतात आपले इलेक्ट्रिक वाहन लाँच केले असून त्यांच्या किंमतींना कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तरी देखील याची किंमत जास्त वाटत असल्यामुळे सरकार सतत यावर काम करत आहे.