1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नई दिल्ली , सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (14:30 IST)

जर तुम्हीपण बुक केले असेल श्रीनगरचे फ्लाईट टिकत, तर नक्की वाचा

जर तुम्ही श्रीनगर जाण्यासाठी किंवा श्रीनगरहून परतण्यासाठी तिकिट बुक केले असतील तर विमानन कंपन्यांकडून ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. हा  दिलासा जम्मू आणि काश्मीरच्या सध्याची परिस्थिती बघून विमानन कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात येत आहे. बजेट एअरलाईन विस्ताराकडून सांगण्यात येत आहे की जे ग्राहक 7 सप्टेंबरपर्यंत श्रीनगरहून पुढे किंवा श्रीनगर जाण्यासाठी आपले आधीपासून बुक फ्लाईटला रद्द करवतात किंवा यात्रेच्या तारखेत बदल करतात तर त्यांच्याकडून  कँसलेशन चार्ज घेण्यात येणार नाही.  
 
तिकिट कँसल केल्याने मिळेल पूर्ण रीफंड
तिकिट कँसल करवणार्‍या प्रवाशांना पूर्ण रीफंड देण्यात येईल. तसेच जे यात्री आपल्या प्रवासाच्या तारखेत बदल करतात त्यांच्याकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही पण फ्लाईटची तारीख पुढील वाढवण्यात आली असेल तर त्या दिवसाचे भाडे आणि वर्तमान भाड्यात जे अंतर असेल त्याचे भुगतान त्यांना करावे लागणार आहे.  
 
या हेल्पलाइनवर फोन करावा
विस्तारा एअलाइंसने हेल्पलाइन नंबर (+919289228888) प्रसिद्ध करत म्हटले आहे की हा हेल्पलाइन नंबर 24*7 चालतो. यावर फोन करून ग्राहक एयरपोर्टवर विस्ताराच्या टिकटिंग ऑफिसर्सशी संपर्क करून आपल्या तिकिटांमध्ये बदल करू शकतात.  
 
कलम 370 संपल्यानंतर बनली आहे अशी स्थिती  
जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370ला भारत सरकारद्वारे संपुष्टात आणल्यानंतर विमानन कंपन्या तेथे गेलेल्या पर्यटकांना तेथून काढण्यात सतत फ्लाईट्स चालवत आहे. बरेचसे पर्यटकांनी काश्मीर फिरायला जाण्याची योजना आखली होती पण तिथली परिस्थिती बघता सध्या जाण्यास इच्छुक नसतील तर अशात एअरलाइंसकडून तिकिट रद्द केले तर पूर्ण रीफंड पर्यटकांना देण्यात येईल.