1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (15:19 IST)

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष निवडीकरिता भाजपाकडून मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली आहे. यामध्ये राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँके वर भाजपाप्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनल चे 11 संचालक निवडून येत निर्विवाद बाजी मारल्यानंतर अध्यक्ष पदाकरिता भाजप कडून कोणाचे नाव निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यात अनेक नावे चर्चेत असतानाच अखेर भाजपाकडून अध्यक्ष पदाकरिता या बँकेच्या निवडणुकीच्या कोअर टीम मध्ये असलेले व मतदानाचा हक्क न बजावता देखील बहुमताने विजयी झालेले मनीष दळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
 
तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मनीष दळवी व अतुल काळसेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपच्या गोटातून अध्यक्ष पदासाठी संचालक अतुल काळसेकर, विठ्ठल देसाई, गजानन गावडे ही नावे चर्चेत असताना मनीष दळवी यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. मनीष दळवी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावरच संतोष परब हल्ला प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यानंतर मनीष दळवी हे अज्ञातवासात होते.