#MeTooच्या निमीत्ताने अशीही जाहिरात
#MeTooच औचित्य साधत शारिरीक संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कंडोम कंपन्यांनीही जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ड्युरेक्स या कंडोम कंपनीने ट्विटरवर टाकलेल्या एका क्रिएटीव्ह पोस्टद्वारे शारिरीक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीची परवानगी किती महत्त्वाची असते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मॅनफोर्स या कंपनीनेही शारिरीक संबंध बनवण्याआधी पुरूषांनी दहा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात या आशयाची पोस्ट केली आहे. या 10 च्या 10 गोष्टींमध्ये शारिरीक संबंधांसाठी समोरच्या व्यक्तीचा नकार असेल तर त्या नकाराचा सन्मान करावा, नकार हा नकारच असतो असा संदेश दिला आहे.