रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 2 मे 2018 (17:12 IST)

घरगुती सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिना सबसिडीवाला सिलेंडर आणि 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये जास्त दिलासा देण्यात आला आहे. 1 मे पासून बिना सबसिडीचा सिलेंडर दिल्लीमध्ये 650.50 रुपये, कोलकातामध्ये 674 रुपये, मुंबईमध्ये 623 रुपये आणि चेन्नईमध्ये 663 रुपये झाला आहे. दिल्लीमध्ये सिलेंडर 3 रुपयांनी कमी झाला आहे. कोलकाता आणि मुंबईमध्ये 2-2 रुपयांनी किंमती कमी झाल्या आहेत. बिना सबसिडीचा सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने 1 कोटीपेक्षा अधिक लोकांना फायदा होणार आहे.

 

गेल्या 5 महिन्यांपासून सरकारकडून बिना सबसिडीच्या सिलेंडरचे भाव कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. 5 महिन्यामध्ये दिल्लीमध्ये बिना सबसिडीचा सिलेंडर 96.50 रुपये, कोलकातामध्ये 92 रुपये, मुंबईमध्ये 96 रुपये आणि चेन्नईमध्ये 93 रुपयांनी स्वस्त झाला आहे.