गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (08:54 IST)

सिलिंडर दरात कपात

घरगुती अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर दरात ६ रुपये ५२ पैशांनी कपात करण्यात आलेय. तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात १३३ रुपयांनी स्वस्त करण्यात आलाय. एलपीजी सिलिंडरची किंमत सहा महिन्यांनंतर कमी केली गेली आहे. जून 2018 पासून एलपीजीच्या किमती वाढत होत्या. 1 नोव्हेंबर रोजी आयओसी सब्सिडीमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये वाढ 2.94 रुपयांनी वाढली होती.
 
आयओसीने म्हटले आहे की, नॉन-सबसिडीड एलपीजी सिलिंडरची किंमत 133 रुपये कमी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रूड ऑइलच्या किंमती कमी झाल्यामुळे एलपीजीच्या किमती कमी झाल्या आहेत. दिल्ली अनुदानित 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 809.50 रुपयांत मिळेल. 1 डिसेंबरपासून नवीन किमती लागू होती. आतापर्यंत 942.50 रुपये किंमत होती.