शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (18:29 IST)

Surya Nutan :महागड्या गॅसच्या टेन्शनपासून सोलर स्टोव्ह देणार सुटका, किंमत जाणून घ्या

एलपीजीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या बजेट कोलमडला आहे . स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढत असल्यामुळे महागड्या गॅस पासून सोलर स्टोव्ह वाचवू शकते. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सौरऊर्जेवर चालणाऱ्या अनोख्या स्टोव्हची रचना केली आहे. हे घरी आणून तुम्ही महागड्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर पासून सुटका मिळवू शकता. 
 
हा सोलर स्टोव्ह स्वयंपाकघरात किंवा कुठेही ठेवू शकता आणि तुमच्या सोयीनुसार वापरू शकता. इंडियन ऑइलने या सौरऊर्जेवर चालणाऱ्या स्टोव्हला सूर्य नूतन असे नाव दिले आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि हरदीप सिंग पुरी यांनी सूर्य नूतन स्टोव्हची तपासणी केली होती.केंद्रीय मंत्र्यांनी इंडियन ऑइलच्या या नवकल्पनाचे कौतुक केले आहे.
 
वैशिष्टये -
सूर्य नूतन सोलर स्टोव्हच्या वैशिष्ट्याबद्दल बोललो तर ते कायमस्वरूपी एकाच ठिकाणी स्थापित केले जाऊ शकते.  ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात गॅस स्टोव्ह लावला आहे, तो तुम्हीही बसवू शकता. ही रिचार्जेबल आणि इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीम आहे. हे इंडियन ऑइलच्या आर अँड डी सेंटर, फरीदाबाद यांनी डिझाइन आणि विकसित केले आहे. इंडियन ऑईलने त्याचे पेटंटही घेतले आहे. 
 
हे स्टोव्ह कसे काम करते- 
सूर्या नूतन सोलर स्टोव्हचे दोन युनिट आहेत. एक स्टोव्ह आहे, जो आपण स्वयंपाकघरात ठेवू शकता. दुसरे युनिट सूर्यप्रकाशात राहते आणि चार्ज होत असताना ऑनलाइन कुकिंग मोड देते. याशिवाय चार्ज केल्यानंतरही वापरता येणार आहे. अशा प्रकारे 'सूर्य नूतन' सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करते.  हा स्टोव्ह हायब्रिड मोडवरही काम करतो. म्हणजेच सौरऊर्जेशिवाय या स्टोव्हमध्ये विजेचे इतर स्रोतही वापरता येतील. 
 
सूर्या नूतनचे इन्सुलेशन डिझाइन असे आहे की ते सूर्यप्रकाशाचे किरणोत्सर्ग आणि उष्णतेचे नुकसान कमी करते.  सूर्या नूतन तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. या सोलर स्टोव्हचे प्रीमियम मॉडेल चार जणांच्या कुटुंबासाठी संपूर्ण जेवण (नाश्ता + दुपारचे जेवण +  रात्रीचे जेवण) आरामात तयार करू शकते. 
 
किंमत- 
या सोलर स्टोव्हची किंमत 12,000 रुपयांपासून सुरू होते. त्याच्या बेस मॉडेलची किंमत सुमारे 12,000 रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत सुमारे 23,000 रुपये आहे. इंडियन ऑइलचे म्हणणे आहे की आगामी काळात त्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात.कंपनीने नुकताच आपला सोलर स्टोव्ह बाजारात आणला आहे, तो घरी आणून तुम्ही गॅसच्या वाढत्या किमतीच्या तणावातूनही सुटका मिळवू शकता.