गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (14:50 IST)

अण्णा हजारे यांचा राज्य सरकारला इशारा

wine
राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
 
“मॉल संस्कृती ही काही भारतीय संस्कृती नाही. ही विदेशातली संस्कृती आहे. विदेशातील संस्कृती भारतात आणायची आणि मग तिथे नको ते गोष्टी विकायला ठेवायच्या हे बरोबर नाही. आताचं सरकार मॉल, दारू या सारख्या गोष्टींचा विचार करणार नाही, असा मला विश्वास आहे. मात्र, असं काही घडलचं तर आम्हाला आमच्या मार्गाने आंदोलन करावे लागले”, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे.