लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे निधन
महाराष्ट्राचे लोकशाहीर, ख्यातनाम लोककलावंत विठ्ठल उमप यांचे शुाᆬवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पवित्र दीक्षाभूमी येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना तातडीने डॉ. उदय माहूरकर यांच्या इस्पितळात नेण्यात आले; मात्र काहीही उपयोग झाला नाही. मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी मुंबईतील चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दीक्षाभूमी येथे आज सायंकाळी 'लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल'चा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्याक्रमात लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा 'आंबेडकरी जलसा' हे विशेष आकर्षण होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते; मात्र दीक्षाभूमीवर कार्याक्रम असल्याने त्यांनी आयोजकांना उपस्थितीची ग्वाही दिली होती.त्यानुसार ते मुलांसह कार्याक्रमासाठी नागपुरात दाखल झाले होते. ते दीक्षाभूमीवर पोहचताच अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी पदस्पर्श करीत त्यांचा आशीर्वाद घेतला. व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन केले व माईक हाती घेत, 'जय भीम' म्हणून भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. हजारोंच्या जनसमुदायाच्या साथीने जयघोष करतानाच त्यांना गहिवरून आले व त्यातच त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. तत्पूर्वी, सूरमणी पं. प्रभाकर धाकडे व लोकशाहीर विठ्ठल उमप यांची झालेली गळाभेटही उपस्थितांनी डोळ्यात साठवून घेतली. अ. भा. भिक्खू महासंघाचे अध्यक्ष सदानंद महास्थवीर व भिक्खू संघाला वंदन करण्यासाठी झुकले असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पाच मुले व मोठा आप्त परिवार आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांची 'जांभूळ आख्यान', 'विठ्ठल रुक्मिणी' व 'खंडोबाचं लगीन' ही गाजलेली लोकनाट्य होती. त्यांना राष्ट्रपताइच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता. ते सातत्याने ४० वर्षे आकाशवाणीचे कलावंत होते. लोककला, अभिनयाच्या क्षेत्रात उमप यांचे फार मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मान्यवरांनी, चाहत्यांनी अवंती रुग्णालयात गर्दी केली. यापूर्वी शिवसेनेतर्पेᆬ आयोजित महाराष्ट्रदिनाच्या कार्याᆬमासाठी विठ्ठल उमप नागपुरात आले होते. हे विशेष.