अभिनेता अनिकेत विश्वासरावला लाखोचा गंडा
अभिनेता अनिकेत विश्वासराव याला एका टोळीने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबतची माहिती स्वत: अनिकेतने फेसबुकवर लाईव्हद्वारे दिली आहे. या टोळीने मदतीच्या नावे लाखो रुपये उकळून, पलायन केल्याचे अनिकेतने फेसबुक लाईव्ह म्हटले म्हटलं आहे.
या टोळीमध्ये एक मुलगी, एक मुलगा व एका मध्यमवयीन पुरुषाचा समावेश होता. ही टोळी सुरुवातीला लोकांना भेटतात, त्यांच्याकडे मदतीसाठी याचना करतात. कधी स्वयंसेवी संस्था, तर कधी कॅन्सरग्रस्तांना मदत अशी विविध कारणं सांगून ते लोकांना गंडा घालतात. स्वतःला आलेल्या अनुभवावरुन अनिकेतनं लोकांना अशा टोळींपासून सावध राहण्याचं आवाहन केले आहे.
''आजकाल लोक एनजीओ, म्युचअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली, कॅन्सर पीडित रुग्णांच्या मदतीसाठी भेटतात. मात्र, त्यांचा नेमका हेतू काय आहे, हे कळत नाही. आपण त्यात अडकतो. पैशाचं नुकसान होतं. पण भावना दुखावल्या जातात, माणुसकीवरील विश्वास उडतो. मी याला बळी पडलो, काही लाख रुपयांचा गंडा पडला आहे. माझ्या बाबतीत जे झालं, ते तुमच्या बाबतीत होऊ नये, तुम्ही सतर्क रहा'', असे अनिकेतनं फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे.