सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2023 (15:12 IST)

Bharat Jadhav : भरत जाधवने हात जोडत प्रेक्षकांची माफी मागितली

social media
Bharat Jadhav : अभिनेता भरत जाधव सध्या महाराष्ट्र्रात 'तू तू मी मी' या नाटकाचे प्रयोग करत आहे. भरत जाधव हे रत्नागिरीत नाटकाचे प्रयोग करत असताना त्यांना एसी आणि साऊंड सिस्टीम नसल्यामुळे संतापून त्यांनी पुन्हा रत्नागिरीत प्रयोग करणार नाही असे म्हणत प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे.त्यांचा प्रयोगाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ते म्हणत आहे. " एसी नसल्याने काय होत हे आमच्या भूमिकेतून पहा  

शनिवारी रात्री त्यांच्या तू तू मी मी  या नाटकाचा प्रयोग होता. त्यात नाट्यगृहात एसी आणि साऊंड सिस्टीम नसल्यामुळे  नाटयगृहेच्या दुर्व्यवस्थांवर ते संतापले आणि रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली. 
 
त्यांच्या तू तू मी मी नाटकाचं दिग्दर्शन केदारशिंदे यांनी केलं आहे.तर कमलाकर सातपुते, ऐश्वर्या शिंदे, निखिल चव्हाण आणि रुचिरा जाधव असे त्यात कलाकार आहे. 
भरत जाधव यांनी या आधी देखील नाट्यगृहाच्या दुर्व्यवस्थेबद्दल म्हटले आहे. रत्नागिरीत त्यांनी प्रेक्षक एवढे कसे काय शांत राहू शकतात असे विचारले आहे. त्यांनी पुन्हा रत्नागिरीत शो करणार नाही असे म्हणत प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. 


Edited by - Priya Dixit