Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'स्माईल प्लीज'चे प्रेरणादायी अँथम सॉन्ग

Updated: शुक्रवार, 5 जुलै 2019 (15:59 IST)
 
'चल पुढे चाल तू वाट ही आपली' असे म्हणत सर्वच कलाकार प्रेक्षकांना जगण्याची एक नवी ऊर्जा देत आहेत. जीवन जगताना सर्वांसमोर रोज एक नवीन आव्हान उभे असते, असे असले तरी आपण आपले जगणे सोडत नाही. कधी आव्हानांवर यशस्वीरित्या मात करून तर कधी अपयशी होऊन आपण जगतच असतो. अशाच आपल्या जगण्याला एक नवीन प्रेरणा, नवीन उमेद देणारे हे गाणे आहे. या गाण्यात उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकर, भूषण प्रधान, चिन्मय मांडलेकर, चिन्मयी सुमीत, रेणुका शहाणे, हर्षदा खानविलकर, शरद केळकर, मेघा धाडे, सिद्धार्थ चांदेकर, मृणाल कुलकर्णी, मृन्मयी गोडबोले, प्रार्थना बेहेरे, प्रिया बापट, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, सचिन पिळगावकर, सई लोकूर, मिताली मयेकर, सागरिका घाटगे, श्रिया पिळगावकर, सोनाली खरे, स्पृहा जोशी, तेजस्विनी पंडित, मानसी नाईक, वैभव तत्ववादी यांच्यासोबतच मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, आदिती गोवित्रीकर, बॉस्को - सिझर, रोहन गोखले, रोहन प्रधान आणि विक्रम फडणीस या सर्व कलाकारांची झलक दिसणार आहे. हे गाणं चित्रित करणे तितकेसे सोपे नव्हते. कारण ह्या गाण्याला एका दिवसातच चित्रित करण्यात येणार होते. विक्रम फडणीस यांनी ह्या गाण्याबद्दलची कल्पना जेव्हा इंडस्ट्रीमधल्या कलाकारांना सांगितली तेव्हा एका झटक्यात सगळ्यांनी होकार दिला. सगळ्या कलाकारांनी होकार तर दिला, पण विक्रम फडणीस यांना सर्व कलाकार एकाच दिवशी त्यांच्या तारखा देतील का? असे वाटत असतानाच शक्य तितक्या सर्व कलाकारांनी उत्तमरित्या सहकार्य केले. हे स्पेशल गाणं चित्रपटाच्या संपूर्ण टीमने जगातील अशा लोकांना समर्पित केले आहे जे लोकं जगण्यासाठी संघर्ष करतात.
 

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

कंगना रणौतने सेल्फी व्हिडिओ शेअर केला, पंतप्रधान मोदींनी आपल्याला हा निर्णय घेण्यास प्रेरित केले असे म्हटले

मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात रेखा यांना विशेष सन्मान मिळणार; 'उमराव जान' प्रदर्शित होणार

गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनासाठी नक्की भेट द्यावी अशी काही प्रमुख मंदिरे; Guru Purnima temples darshan

देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद यांचे लंडनमधील त्याच रुग्णालयात निधन, जिथे त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला होता

आसाममध्ये विनाशकारी पुरामुळे लाखो कुटुंबे बेघर; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमान खान पुढे आला!

पुढील लेख
Show comments