गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

“थिएटर ऑफ रेलेवन्स”नाट्यदर्शनाचा २५ वर्षपूर्ती सोहळा

काळाला चिंतनाने गढले आणि रचले जाते. ‘चिंतन’हे आपल्या अंतरंगातून सृजित होते आणि वैश्विक क्षितिजांना पार करून विश्वात जीवित राहते. कलात्मक चिंतनात मानवातील विष पिण्याची क्षमता आहे. १९९० नंतरचा काळ हा संपूर्ण जगासाठी “अर्थहीन”होण्याचा काळ आहे , हा एकाधिकार आणि वर्चस्ववादाचा काळ आहे. विज्ञानाच्या सिद्धांतांचा तंत्रज्ञाना पुरता सीमित होण्याचा आणि खरेदी-विक्रीचा काळ आहे. मीडियाचा जनतेऐवजी सत्तेची चाकरी करण्याचा काळ आहे. अशावेळेस जनतेला त्यांच्या मुद्यांसाठी "चिंतन”आणि एका विचार मंचाची आवश्यकता आहे. १२ ऑगस्ट १९९२ पासून “थियेटर ऑफ रेलेवंस”रंग सिद्धांत जनतेसाठी 'जन चिंतन मंच 'म्हणून उदयास आला आणि १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंग दर्शन यात्रेची २५ वर्षे पूर्ण केली. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स”नाट्य दर्शनाने, रस्ते, चौक, गावे, आदीवासी पाडे आणि शहरांतून आपली वैश्विक उड्डाण भरून आपली जागतिक स्वीकृती मिळवली आहे
 
‘थिएटर ऑफ रेलेवंस’चे सिद्धांत
 
१) ‘थिएटर ऑफ रेलेवंस’हा एक असा रंगमंच आहे, ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
 
२) कला ही कलेसाठी नसून समाजाप्रती स्वतःची जबाबदारी स्वीकारेल. लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.
 
३) जे मानवी गरजा भागवेल आणि अभिव्यक्तीचे एक माध्यम  म्हणून उपलब्ध असेल.
 
४) जे स्वतःचा बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल. स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.
 
५) जे मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा पद्धती बनेल.
 
( रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस”चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस”चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस”नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे.)

आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात,  मानवाचे मानवी असणे हे आव्हान झाले आहे. नाटक “गर्भ”, “अनहद नाद – Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी” या नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आंतील मानवाचा आवाज ऐकवण्यासाठी, पनवेल मध्ये १८, १९ आणि २० डिसेंबर २०१७ रोजी तीन दिवसीय 'नाट्य उत्सव' साजरा करण्याचे आयोजन केले आहे . आपल्या अर्थपूर्ण आणि सृजनात्मक, रचनात्मक सहभागाची अपेक्षा आहे . कारण “थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांतानुसार ,’प्रेक्षक’ हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहेत.
 
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी” नाटकांची प्रस्तुती वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल. येथे अनुक्रमे १८ डिसेंबर २०१७ ला रात्रौ ८.३० वा , १९  डिसेंबर २०१७ ला सायं. ५.०० वा. आणि  20 डिसेंबर  २०१७  रोजी  रात्रौ ८.३० वाजता होईल.