गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

रिंकूला त्रास देणार्‍या तरुणाला अटक

अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) हिला वारंवार त्रास देणार्‍या ठाणे येथील तरुणाला अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. अकलूजमधील दहावीच्या परीक्षा केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. 
 
दत्तात्रय घरट (रा. सरळगाव, ता. मुरबाड, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. आर्ची अकलूज परीक्षा केंद्रावर दहावीचे पेपर देत आहे. बुधवारी सकाळी पेपर सुरू असताना दत्तात्रय हा शाळेजवळ आला. या वेळी त्याने आर्चीला भेटण्याचा हट्ट धरला. मात्र, त्याला भेट नाकारण्यात आली. घरट हा मागील चार-पाच महिन्यांपासून अकलूजला घरी येऊन आर्चीला भेटण्यासाठी वेळ मागत होता. त्याला समजावून सांगण्यात आले होते. तरीही अनेकदा गावात येऊन भेटण्याचा हट्ट करत होता.