रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (09:08 IST)

SARI - प्रेमाची परिभाषा सांगणार सरी

sari
आयुष्य कधीतरी एका अशा वळणावर येते, जिथे पुढे काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की, 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. याच आशयाचा 'सरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसतील. कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन अशोका के. एस. यांनी केले असून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर 'सरी'च्या निमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.
 
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, '' मी प्रथमच मराठीत चित्रपट दिग्दर्शित करत आहे. मराठीत काम करताना मजा आली. मराठी कलाकार अतिशय प्रतिभाशाली आहेत. चित्रपटाबद्दल सांगायचं तर ही एक प्रेमकहाणी आहे. प्रेमात पडलेल्या तरुणतरुणींच्या आयुष्यात अनेक वळणे येतात, अनेक आश्चर्यकारक घटना घडतात, चमत्कार घडतात, ज्यांचा कधी कोणी विचारही केलेला नसतो. मनाला भिडणारी ही कथा आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल.''