गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated: बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (17:24 IST)

सुबोध भावेने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने ट्विटरला राम राम केले आहे. आपल्या शेवटल्या ट्विटमध्ये त्याने अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले. मात्र अचानक सुबोधने ट्विटर सोडल्यामुळे चाहते हैराण आहे. यामागील कारण अद्याप कळून आले नाही. 
 
‘आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाऊंट डिलीट करतो आहे. काळजी घ्या, मस्त राहा, जय महाराष्ट्र, जय हिंद’, असे त्याने शेवटचे ट्विट केले आहे.
 
दरम्यान अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुबोधने देखील हा निर्णय घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर दुषित वातावरण असल्यामुळे देखील अनेकांनी सोशल मीडियाला राम राम केले आहे.