गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:16 IST)

‘लागिरं झालं जी’मालिकेतील अभिनेत्याचे कार अपघातात निधन

‘लागिरं झालं जी’या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेते ज्ञानेश माने यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि तितकीच दुःखद बातमी समोर येत आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना ज्ञानेश माने यांच्या चारचाकी गाडीला भीषण अपघात झाला होता. घाटातील वळणावर झालेल्या या भीषण अपघातानंतर ज्ञानेश माने बेशुद्ध झाले होते. ज्ञानेश बेशुद्धावस्थेत पडून असल्याचं काही जणांनी पाहिलं आणि या स्थानिकांनी त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. पण दुर्दैव म्हणावे लागेल कि, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच ज्ञानेश यांनी प्राण सोडले होते. ज्ञानेश यांच्या निधनाने संपूर्ण माने कुटुंबावर शोककळा पसरली असून ऐन उमेदीच्या काळात त्यांचे निधन झाल्यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.