मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2023 (22:05 IST)

‘वेड’चित्रपट १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणार

ved marathi movie
शाहरुख खानच्या ‘पठाण’चित्रपटाला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. पाच दिवसांमध्येच या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या काही आठवडे आधीच रितेशचा मराठी ‘वेड’चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये येत आहेत.
 
‘पठाण’चाच सगळीकडे बोलबाला असताना रितेशने ‘वेड’च्या बॉक्सऑफिस कलेक्शनबाबत दिलेली माहिती थक्क करणारी आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 
जगभरात ७० कोटी ९० लाख रुपये इतपत कमाई केली आहे. तर देशभरात ५८ कोटी ११ लाख रुपये कमावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन ३१ दिवस उलटल्यानंतरची ही आकडेवारी आहे.
 
“अतिशय आनंदी, आभारी, ऋणी ”असं रितेशने ही पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. रितेशने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ‘पठाण’चा या चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे. आता ‘वेड’चित्रपट १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor