गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

नाव वापरल्याने मॅक्स मोबाइल विरोधात धोनी कोर्टात

नवी दिल्ली- भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मॅक्स मोबाइल विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. डिसेंबर 2012 मध्येच करार संपूनही कंपनी आपल्या नावाचा वापर ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करत असल्याचा आरोप धोनीने केला आहे.
 
धोनीच्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने मॅक्स मोबिलिंक प्रायव्हेट लिमिटेडच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांना धारेवर धरले आहे. तुम्ही आदेशाचे पालन का करत नाही? असा सवाल कोर्टाने विचारला आहे. 21 एप्रिल 2016 रोजी हायकोर्टाने विचारला आहे. 21 एप्रिल 2016 रोजी हायकोर्टाने करार संपल्यामुळे धोनीच्या नावाचे वापर न करण्यास बजावले होते.
 
जाहिरातीत आपल्या नावाचा वापर केलेली मॅक्स मोबाइलची प्रॉडक्ट्स विकण्यास बंदी घालण्याची मागणी धोनीने 17 नोव्हेंबर 2014 रोजी केली होती.