शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (15:36 IST)

माजी क्रिकेटर मोहम्मद अजरुद्दीनमनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या समक्ष हजर

Mohammad azharuddin
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि काँग्रेसचे नेते मोहम्मद अजरुद्दीन मंगळवारी हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनमधील मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालया समोर हजर झाले. ईडी ने या प्रकरणी त्यांची चौकशी करत जबाब नोंदवले.
 
सकाळी 11 वाजता पांढरा कुर्ता पायजमा घालून हैदराबादच्या फतेह मैदान रोड वरील ईडीच्या कार्यालयात अजरुद्दीन पोहोचले.त्यांची कायदेशीर टीम त्यांच्या सोबत होती. 

त्यांना सुरुवातीला 3 ऑक्टोबर रोजी ईडीच्या समक्ष उपस्थित व्हायला सांगितले होते मात्र त्यांनी तारीख वाढवून घेतली. म्हणून त्यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर होण्यास सांगितले. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजरुद्दीन यांची HCA अध्यक्ष असतानाची भूमिका एजन्सीच्या चौकशीत आहे. त्यांच्यावर गेल्यावर्षी तेलंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. त्यांची छवी खराब करण्यासाठी प्रतिस्पर्धीनीं कट रचल्याचे त्यांनी म्हटले. 
 
मनी लाँड्रिंग प्रकरणात तेलंगणा लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) ने HCA च्या 20 कोटी रुपयांच्या कथित गुन्हेगारी गैरव्यवहारासंदर्भात दाखल केलेल्या तीन FIR आणि आरोपपत्रांशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. ईडीने सांगितले होते की, गेल्या वर्षी टाकलेल्या छाप्यांमध्ये डिजिटल उपकरणे, 'गुन्हेगार' कागदपत्रे आणि 10.39 लाख रुपये जप्त करण्यात आले होते.

जप्त करण्यात आलेल्या पैशांच्या व्यवहारांचा कोणताही हिशेब नव्हता. अझरुद्दीनने 2009 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून आपली राजकीय खेळी सुरू केली होती. ते तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (TPCC) चे कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.
Edited by - Priya Dixit