शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (18:45 IST)

दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू मॉर्नी मॉर्केल बनले भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक

Morne Morkel
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मॉर्केलचा करार 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बोर्डाने माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती, परंतु सपोर्ट स्टाफची घोषणा केली नाही. राहुल द्रविडच्या कार्यकाळात पारस म्हांबरे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.मॉर्केलला नवीन गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. 
 
दक्षिण आफ्रिकेचा 39 वर्षीय मॉर्केल नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली पसंती होती. दोघांनी आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्समध्ये एकत्र काम केले आहे. यापूर्वी, गंभीर आणि मॉर्केल यांनी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात तीन हंगामात एकमेकांसोबत काम केले होते. मॉर्केलने दक्षिण आफ्रिकेसाठी 86 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने एकूण 544 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.

मॉर्केलचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पहिले काम भारतीय संघासोबत बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका असेल. दोन्ही संघांमधील ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 
Edited by - Priya Dixit