शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (09:29 IST)

हरमनप्रीत कौर बनली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू, मोडला अंजुम चोप्राचा विक्रम

भारताची स्टार फलंदाज हरमनप्रीत कौर बुधवारी बे ओव्हल येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकादरम्यान महिला वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू ठरली. तिने भारताची माजी स्टार फलंदाज अंजुम चोप्राचा विक्रम मोडला.
 
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरने तिच्या 115व्या एकदिवसीय सामन्यात 127 सामन्यांमध्ये अंजुम चोप्राचा 2856 धावांचा आकडा मागे टाकला आहे. 33 वर्षीय खेळाडूने मागील सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावले आणि महिला विश्वचषक स्पर्धेत तीन शतके झळकावणारी ती पहिली भारतीय ठरली.
 
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतला अवघ्या 26 चेंडूत केवळ 14 धावा करता आल्या. तिच्या नावी आता 115 वनडेत 2863 धावा झाल्या आहेत. या यादीत मिताली राजचे नाव सर्वात वर आहे, तिने 228 सामन्यात 7668 धावा केल्या आहेत. 
उजव्या हाताची फलंदाज हरमनप्रीत 121 सामन्यांमध्ये 2319 धावांसह T20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. मिताली राजने 89 टी-20 सामन्यांमध्ये केलेल्या 2364 धावांच्या ती खूप जवळ आहे.