1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (22:43 IST)

IND vs SL: श्रेयस अय्यरने डे-नाईट कसोटीत आश्चर्यकारक कामगिरी केली

IND vs SL: Shreyas Iyer has done an amazing job in the day-night TestIND vs SL: श्रेयस अय्यरने डे-नाईट कसोटीत आश्चर्यकारक कामगिरी केली Marathi Cricket News  In Webdunia Marathi
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने एक खास विक्रम केला आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खेळला जात आहे. या सामन्याच्या दोन्ही डावात श्रेयसने अर्धशतके ठोकली आणि ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. दिवस-रात्र कसोटीच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा तो जगातील चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी स्टीव्ह स्मिथ, डॅरेन ब्राव्हो आणि मार्नस लॅबुशेन यांनी ही कामगिरी केली आहे. 
 
वेस्ट इंडिजच्या डॅरेन ब्राव्होने 2016 मध्ये दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध 87 आणि 116 धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 2016 मध्ये ब्रिस्बेनमध्ये पाकिस्तानविरुद्ध 130 आणि 63 धावांची इनिंग खेळली होती.ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅबुशेनने सामन्याच्या दोन्ही डावात दोनदा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
 
या सामन्यात भारताची पकड मजबूत झाली आहे. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 419 धावांची गरज असून भारताला विजयासाठी नऊ विकेट्स घेण्याची गरज आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने एका विकेटच्या मोबदल्यात 28 धावा केल्या आहेत. कुशल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्ने क्रीजवर आहेत. भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या. अय्यरने 92 आणि पंतने 39 धावा केल्या. अंबुलदेनिया आणि जयविक्रमाने प्रत्येकी तीन बळी घेतले.