शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (09:14 IST)

IND vs SL: हार्दिक T20 चे नेतृत्व करणार , हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद , सूर्या उपकर्णधार असेल

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी टी-20 मालिकेसाठी 'नवीन' टीम इंडियाची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव उपकर्णधार असेल. त्याचवेळी रोहित शर्मा वनडे मालिकेत पुनरागमन करेल. तो संघाची धुरा सांभाळणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची सुरुवात T20 सामन्याने होणार आहे. पहिला टी-20 सामना 3जानेवारीला मुंबईत होणार आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा टी-20 मालिकेसाठी नव्या टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, राहुलच्या अनुपस्थितीचे कारण त्याचे अथिया शेट्टीसोबतचे लग्न असल्याचे मानले जात आहे. 2024 टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून विराट, राहुल आणि रोहित यांना या फॉरमॅटमध्ये निवडले जाणार नाही, असे संकेत आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंतला दोन्ही फॉरमॅटमधून वगळण्यात आले आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी इशान किशन भारताचा यष्टिरक्षक असेल.
 
श्रेयस अय्यरचाही टी-20 संघात समावेश करण्यात आलेला नाही. शिवम मावी आणि मुकेश कुमार हे नवे चेहरे असतील. नुकत्याच झालेल्या मिनी लिलावात शिवम मावी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू होता. त्याला गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमारलाही देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. आयपीएल लिलावात मुकेशला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
 
Edited By - Priya Dixit