बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

#CT17 - भारताने पाकला दाखवला घरचा रास्ता

आईसीसी चैंपियंस ट्रॉफीसाठी बर्मिंगममध्ये झालेल्या भारत- पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकला घरचा रास्ता दाखवला. या सामन्यात युवराज सिंगने पुन्हा एकदा आपल्या खेळाची जादू दाखवून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. युवीने ३२ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५३ धावा फटकावत संपूर्ण स्टेडियम युवीमय केले. या शानदार खेळासाठी युवराजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
 
भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अहमद शहझादला १२ धावांवर पायचीत केल्यावर उमेश यादवने बाबर आझमला अवघ्या ८ धावांवरच तंबूत पाठवले. उमेश यादवच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजाने त्याचा झेल घेतला. यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या अझर अलीला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने दमदार अर्धशकी खेळी करून संघाची धावसंख्या वाढवली. मात्र जोरदार फटकेबाजीच्या प्रयत्नात असताना रविंद्र जडेजाने त्याचा बळी घेतला.
 
शोएब मलिकला १५ धावांवरच रविंद्र जडेजाने धावबाद केले. मलिक बाद झाल्यानंतर कर्णधार सर्फराज अहमदही तंबूत परताला. सर्फराज अहमदला हार्दिक पंड्याने १५ धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. अमाद वासिमही हार्दिक पंड्याचा शिकार ठरला. भारताकडून यादवने तीन फलंदाज बाद केले तर पंड्या, आणि जाडेजाने प्रत्येकी दोन बळी मिळवले. तर भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतला.
 
दोनवेळा पावसाच्या व्यत्ययानंतर भारतीय फलंदाजांनी पाकच्या फलंदाजांची चांगलीच धुलाई करत ३१९ धावांचा पाऊस पाडला. शिखर आणि रोहितने सुरुवातीलाच चांगल्या धावसंख्या उभारली होती. रोहीत शर्माने ११९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ९१ धावांची खेळी केली तर शिखरने ६५ चेंडूत ६ चौकार १ षटकारांसह ६८ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली, युवराज सिंग यांनी जोरदार धावांचा पाऊस पाडला.
 
शेवटच्या षटकांत हार्दिक पांड्याने जाता जाता तीन षटकारांची आतषबाजी करत पाकिस्तानसमोरील आव्हान आणखी अवघड केले. भारतीय फलंदाजांनी संयमाने फलंदाजी केली. चार फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. रोहित शर्मा (९१) आणि शिखर धवन (६८) यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रोहित आणि धवनने पाया रचल्यावर ङ्गशिखरफ सर करण्याची जबाबदारी विराट कोहली आणि युवराज सिंगने पार पाडली.
 
विराट कोहलीने नाबाद ८१ धावांची खेळी साकारली, तर युवराजने ५३ धावांची झंझावाती खेळी केली.वेगवान गोलंदाजांना पोषक वातावरणात रोहित शर्मा आणि शिखर धवनने पाकिस्तानी आक्रमणाचा न डगमगता सामना केला. या दोघांनी संघाला शतकी दिली. आक्रमकपणे खेळणारा शिखर धवन बाद झाल्यावर भारतीय डावाचा वेग मंदावला. यानंतर कोहली आणि रोहितने अर्धशतकी भागिदारी रचली.
 
रोहित शर्मा ९१ धावांवर धावबाद झाला. यानंतर कोहली आणि युवराजने चौकार आणि षटकारांची बरसात करत फलंदाजीचा गियर बदलला. त्यामुळे भारताने सहज ३०० धावांचा टप्पा सहज पार केला.