IND vs NZ 1st ODI:हैद्राबाद वनडेत भारताने 12 धावांनी न्यूझीलंडचा परावभ केला
नवी दिल्ली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खूपच मनोरंजक होता. भारताचा पहिला फलंदाज शुभमन गिलने द्विशतक झळकावत संघाची धावसंख्या 8 विकेट्सवर 349 पर्यंत नेली. मायकेल ब्रेसवेलने किवी संघासाठी झंझावाती शतकी खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. भारताने हा सामना 12 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
ब्रेसवेल आणि सँटनर यांनी कहर केला
भारतीय संघाने पहिले 6 विकेट घेत न्यूझीलंड संघाला सहज बॅकफूटवर ढकलले. संघाचे अर्ध्याहून अधिक फलंदाज 131 धावांवर माघारी परतले होते आणि समोर 350 धावांचे लक्ष्य होते. मायकल ब्रेसवेलच्या बॅटचा दबदबा इथून दिसला. 31 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत त्याने अर्धशतक केले आणि काही वेळातच त्याने 57 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. मिचेल सँटनरने 38 चेंडूत अर्धशतक झळकावून सामना बरोबरीत आणला.