Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

29 मार्चपासून आयपीएलचा थरार

Updated: बुधवार, 29 जानेवारी 2020 (15:13 IST)
 
आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई इंडियन्सकडे पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. आयपीएलच्या गत हंगामातील आकडेवारीवर विश्वास ठेवला तर रोहित शर्मा पुन्हा एकदा आयपीएलची ट्रॉफी हातात घेऊ शकतो. 2009 साली रोहितने डेक्कन चार्जर्स आणि 2015 साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही सामने 24 मे रोजीच खेळवण्यात आले होते. मुंबई इंडियन्सने आतार्पंत 2013, 2015, 2017 आणि 2019 या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते.
 
जखमी खेळाडूऐवजी मिळेल दुसर्‍याला संधी
आयपीएलच तेराव्या हंगामासाठी गव्हर्निंग काऊन्सिलने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या नवीन नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर तो मैदानाबाहेर जाऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात दुसर्‍या खेळाडूला संधी मिळू शकते.
 
आयपीएलच्य आगामी हंगामासाठीही हा नियम लागू करण्यात येणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांनी याबद्दल माहिती दिली. दरम्यान, याचसोबत सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नसून, रात्री 8 वाजता सामने खेळवले जाणार आहेत. काही संघमालकांनी सामने रात्री साडेसात वाजता सुरु करावे, अशी मागणी केली होती, मात्र बैठकीत वेळेत कोणताही बदल न करण्यावर शिक्काबोर्तब झाले आहे. याचसोबत यंदाच्या हंगामात डबल हेडर सामन्यांची संख्याही कमी करण्यात आली असून यंदा केवळ 5 डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; हा असेल अजेंडा

यशस्वी जैस्वालला आयसीसीकडून कठोर शिक्षा

दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये ईस्ट झोनची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल

India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

भारत विरुद्ध श्रीलंका सामना तिसऱ्या दिवशी लवकर सुरू होणार! किती वाजता सुरु होईल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments