शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (13:50 IST)

रवींद्र जडेजा पुष्पाच्या स्टाईल मध्ये मैदानात

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यादरम्यान प्रसिद्ध चित्रपट पुष्पाच्या स्टाईलमध्ये मैदानात दिसले. विकेट घेतल्यानंतर अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटात केलेल्या प्रमाणे जडेजा ने आपल्या दाढीवरून हात फिरवले. या दरम्यान कॉमेंट्री करत असलेल्या इरफान पठाणने 'मैं झुकेगा नही' म्हणत चित्रपटाचा डायलॉग पूर्ण केला. सुमारे अडीच महिन्यांनंतर दुखापतीतून सावरल्यानंतर रवींद्र जडेजा आज भारतीय संघात पुनरागमन करत आहे. याआधीही त्याने याच चित्रपटातील डायलॉगवर इंस्टाग्राम रील बनवून चाहत्यांशी शेअर केले आहे. 
 
 दहाव्या षटकात जडेजा गोलंदाजी करताना  त्याच्यासमोर श्रीलंकेचा फलंदाज दिनेश चांदीमल होते . विकेट मिळाल्यानंतर लगेचच जडेजा पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग रिपीट करताना दिसले.