शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

भारताने कसोटी क्रिकेटत अव्वल स्थान कायम राखले

धरमशाला कसोटीत भारतीय संघाने कांगारुंना लोळवतं 10 लाख डॉलरच्या बक्षिसावर नाव कोरले आहे. कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आयसीसीकडून टीम इंडियाला हे बक्षीस देण्यात आले आहे.

आयसीसीच्या मानांकनात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी आणि बक्षिसावर दावा सांगण्यासाठी 1 एप्रिल 2017 ही अंतिम मुदत आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर भारताचे क्रमांक वनचे स्थान अधिक बळकट झाले आहे. 10 लाख डॉलर म्हणजे जवळजवळ 65 कोटींची कमाई भारताने 2016-17 च्या सत्रात केली आहे.