शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (18:22 IST)

सुपर ओव्हरमध्ये रिंकू सिंगचा जादू दिसला, लागोपाठ तीन षटकार ठोकत संघ विजयी

Rinku singh
आयपीएलमध्ये सलग पाच षटकार ठोकून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून देणाऱ्या रिंकू सिंगने यूपी टी-20 लीगमध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. सुपर ओव्हरमध्ये त्याने सलग तीन षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि त्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. याआधी आयर्लंडविरुद्धच्या T20 सामन्यातही त्याने शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली आणि भारताला चांगली धावसंख्या गाठण्यात मदत केली.  
 
यंदा रिंकूच्या संघाचा मेरठ मारविक्सचा सामना होता काशी रुद्रशी. प्रथम फलंदाजी करताना मेरठ संघाने 20 षटकांत 4 बाद 181 धावा केल्या. मेरठकडून माधव कौशिकने सर्वाधिक 87 धावा केल्या. त्याने 52 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने स्फोटक खेळी खेळली. रिंकूने 22 चेंडूत 15 धावांची संथ खेळी खेळली. मात्र, 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना काशी रुद्र संघ सात गडी गमावून 181 धावाच करू शकला आणि सामना बरोबरीत सुटला. अशा परिस्थितीत सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लागला
 
सुपर ओव्हर मध्ये प्रथम काशीच्या संघाने 16 धावा केल्या. कर्ण शर्माने पाच चेंडूंत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. त्याचवेळी अखेरच्या चेंडूवर मोहम्मद शरीमने षटकार ठोकत काशीची धावसंख्या 16 धावांपर्यंत पोहोचवली. मेरठच्या 17 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रिंकू सिंग आणि दिव्यांश क्रीझवर आले. 22 चेंडूत 15 धावा करणाऱ्या रिंकूवर संघाने विश्वास दाखवला आणि त्याला स्ट्राइकवर पाठवले, पण पहिल्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही. मात्र, त्यानंतर त्याने सलग तीन चेंडूंत षटकार ठोकत आपल्या संघाला दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीने सर्वांना त्या आयपीएल सामन्याची आठवण करून दिली.
 







Edited by - Priya Dixit