नाशिक क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानाची बातमी, ‘या’ क्रिकेटपटूची निवड

maya
Last Modified सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (22:24 IST)
नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची याही वर्षी प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे.

माया सोनवणे ही उत्तम फिरकीपटू असून ऑक्टोबर अखेर डेहराडून येथे झालेल्या महिला एकदिवसीय
सामन्यांच्या स्पर्धेत मायाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्या स्पर्धेत मायाने ५ सामन्यात २१ षटकांत केवळ ३.३३ च्या सरसरीने ७० धावा देऊन ४ गडी बाद केले. चार षटकांत १२ धावांत ३ बळी अशी तिची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी होती.

२०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बात करण्याचा पराक्रम केला होता. पुदुचेरी येथे झालेल्या २३ वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत २०१८-१९ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती. ह्या सगळ्या लक्षणीय, सातत्यपूर्ण कामगिरी च्या जोरावर मायाची मागील हंगामा प्रमाणे यंदाही प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली आहे.

मुळची सिन्नरची असलेली माया सोनवणे , सिन्नरचे सुनील कानडी ह्यांच्यामुळे क्रिकेट कडे वळली . अगदी सुरुवातीपासूनच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर ह्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले . तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव, सिन्नर ह्यांचे ही
वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

वयाच्या केवळ ११ व्या वर्षी च मायाची महाराष्ट्र संघासाठी निवड झाली होती. दुखापतीमुळे दुर्दैवाने मायाचे दोन हंगाम वाया गेले. एक अतिशय भरवशाची अष्टपैलु खेळाडु होण्याचे तिचे स्वप्न आहे. योगायोगाने पुर्वी कधीही न बघितलेल्या द. आफ्रिकेच्या कंबरेत अतिशय वाकुन खास शैलीत गोलंदाजी करणार्‍या पॉल अॅडम्स प्रमाणेच माया उजव्या हाताने सुरेख लेग स्पिन टाकते. आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडु स्नेह राणा ह्या इंडिया ए संघाची कर्णधार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे सदर चॅलेंजर ट्रॉफीसाठी ची स्पर्धा विजयवाडा येथे ४ ते ९ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

IND vs IRE T20 :भारताचा आयर्लंडवर विजय

IND vs IRE T20 :भारताचा आयर्लंडवर विजय
भारतीय संघाने डब्लिन इथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी20 लढतीत आयर्लंडवर 7 विकेट्सनी विजय ...

Ranji Trophy: विजेत्या मुंबईला हरवून मध्य प्रदेश ...

Ranji Trophy: विजेत्या मुंबईला हरवून मध्य प्रदेश पहिल्यांदाच चॅम्पियन
मध्य प्रदेश संघाने अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करून रणजी ट्रॉफी 2021-22 चे विजेतेपद ...

IND W vs SL W: भारतीय महिला संघाने केले चमत्कार, ...

IND W vs SL W:  भारतीय महिला संघाने केले चमत्कार, श्रीलंकेविरुद्ध T20 मालिका जिंकली, हरमनप्रीतची अष्टपैलू कामगिरी
भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला. सलग दुसऱ्या T20 ...

कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोनाची लागण ...

स्मृती मंधाना विराट-रोहितसोबत खास क्लबमध्ये दाखल, ...

स्मृती मंधाना विराट-रोहितसोबत खास क्लबमध्ये दाखल, हरमनप्रीतने मोडला मिताली राजचा मोठा विक्रम
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी T20 ...