बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

या महागड्या घरात राहतील विराट- अनुष्का

विवाह बंधनात अडकल्यापासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा चर्चेत आहे. रोममध्ये हनीमून साजरा केल्यानंतर ते दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन देणार आहेत. तसेच त्यानंतर हे जोडपं आपल्या नवीन घरात शिफ्ट होणार आहे. या शानदार घराची किमतीप्रमाणेच त्याचे इंटीरियरदेखील आहे.
 
त्यांची लग्नाची प्लानिंग आधीपासून असावी म्हणून विराट कोहलीने 2016 मध्ये मुंबईच्या वर्ली क्षेत्रात ओंकार- 1973 बिल्डिंगमध्ये लग्झरी अपार्टमेंट बुक केले होते, ज्याची किंमत 34 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. हे अपार्टमेंट 7,171 स्क्वेअर फीट क्षेत्रात पसरलेला आहे. यात 5 बेडरूम आहेत. तिन्ही टॉवर्समध्ये सर्वात लग्झरी सी-टॉवर यात 35 व्या फ्लोअरवर हे अपार्टमेंट बनलेले आहे. येथून अरेबियन सी याचे व्यूह दिसत असल्यामुळे अनुष्काला हे अपार्टमेंट पसंत आहे.
 
युवराज सिंगने विराट कोहलीला हे अपार्टमेंट घेण्याचा सल्ला दिला होता कारण तो स्वत: या बिल्डिंगच्या 29 व्या फ्लओरवर राहतो.