जागतिक कुटुंब दिन : कुटुंबात हवी सहनशीलता!

International Family Day 2020
International Family Day
Last Modified शुक्रवार, 15 मे 2020 (09:24 IST)
भारतीय कुटुंब पद्धतीबाबत विचार केला असता प्राथमिक व संयुक्त कुटुंबपद्धत एकविवाही व बहुविवाही कुटुंपद्धत, मातृसत्ताक व पितृसत्ताक कुटुंबपद्धत आढळून येते. कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह खरतर माणसामधील नाती ही आपल्या जन्मावरून विवाहवरून अथवा एखाद्याला दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. खर तर एकत्र कुटुंबपद्धती इतर दुय्यम नातेसंबंधाचा अंतर्भाव होतो.

एकिक कुटुंबसंस्थेत आजी-आजोबा, आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी, काका-काकू त्यांची मुले-मुली असे घटक असतात. साधारण: वडील हा कुटुंबाचा प्रमुख असतो. भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. प्राचीन काळापासून अगदी रामायण महाभारताच्या काळात आपण पाहिले तर, एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. आज बायका संसाराला हातभार म्हणून नोकर्यात करायला लागल्या आहेत. त्यामुळे नवरा बायको दोघे नोकरीसाठी बाहेर असतात. त्यांची मुले शाळेत असली तरी, त्यांना डब्यात पोळी-भाजी ऐवजी कुरकुरे, केक, ड्रायफुड असे काहीतरी दिले जाते. खर तर कुटुंब म्हटलं म्हणजे एक माळच आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्याने गुंफल्या जाते. कुटुंबात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा घटक असतो. संकटाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंबपद्धतीत एकजुटीने संकटाचा सामना करतात.
कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. ज्या कुटुंबात प्रेम नसेल, ते कुटुंब, कुटुंब नसून स्मशान आहे. असे समजावे. आपल्याला माहित आहे. स्मशानात अनेक प्रेत असतात, परंतु एकमेकांना कदी भेटन नसतात किंवा बोलत नसतात. ज्या कुटुंबात सासू-सून, पती-पत्नी आणि पिता-पुत्र एकत्र राहत असूनही एकमेकांना बघून आनंदीत होत नसतील, तर ते कुटुंब स्मशान नाही काय? आपल्या कुटुंबाचे ऐक्य नेमहीसाठी टिकून राहील, हा सुखी कुटुंबाचा खरा महामंत्र आहे. 'हेल्पेज इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 52 टक्के वृद्ध अशिक्षित आहेत. 50 टक्के वृद्ध आर्थिक दृष्ट्या आपल्या मुलांवर व सुनांवर अवलंबून आहेत. 85 टक्के वृद्ध वैद्यकीय उपचारावरील खर्चासाठी इतरांवर अवलंबून आहेत. 98 टक्के वृद्ध हे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलत नाहीत. याबाबत तक्रार करणे मग लांबच राहते. अपमान सहन करणे हा या वृद्धांच्या दिन चर्येचाच भाग बनला आहे. 15 मे म्हणून आपण संपूर्ण जगात साजरा करतो. आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खर तर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही. 15 मे जागतिक कुटुंब दिनी भारतातील सर्व कुटुंबीय आनंदाने आणि सुख समृद्धीने नांदावे तसेच एकत्र कुटुंबपद्ध सर्वत्र रूजावी व एकत्रर कुटुंबपद्धतीत वाढ व्हावी, एवढीच या 'जागतिक कुटुंब दिनी' अपेक्षा!


यावर अधिक वाचा :

...तर भाजपच्या 'त्या' 12 आमदारांचं निलंबन रद्द होऊ शकतं

...तर भाजपच्या 'त्या' 12 आमदारांचं निलंबन रद्द होऊ शकतं
"एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई म्हणजे ही आमदारालाच नव्हे, तर त्या मतदारसंघालाही दिलेली ही ...

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता
'मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम', असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. ...

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
भारतीय हवामानविभागाच्यवतीनं देण्यात आलेल्याइशार्‍यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ...

30 हजाराची 'मिनी फोर्ड'

30 हजाराची 'मिनी फोर्ड'
सांगलीशहरातील काकानगर या ठिकाणी राहणार्‍या अशोक संगाप्पा आवटी यांनी अवघ्या 30 हजार ...

Corona Update: देशात कोरोना झाला अनियंत्रित, आले 2.50 ...

Corona Update: देशात कोरोना झाला अनियंत्रित, आले 2.50 लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. आज, गुरुवारच्या तुलनेत सुमारे 6.7 टक्के ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही
बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा ...

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते
आजच्या युगात जवळपास सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. खरेदी असो किंवा पैशांचे व्यवहार असो, ...

अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार
पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर रिक्षाचे भाडे ...

रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा का होत आहे?

रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा का होत आहे?
"रश्मी ठाकरे या पडद्यामागून राजकारणाची अनेक सूत्र सांभाळतात. जर उद्धवजींनी आदेश दिला तर ...

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला करोनाची लागण

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला करोनाची लागण
अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि 'अनाथांची माय' या नावानेच ...